Monday 9 March 2015

Posted by samirsinh dattopadhye on 00:10 No comments
Aniruddha Bapu Anubhav

स्वप्नात आलेल्या यमदूताच्या रूपातील स्त्रिया, श्रद्धावान बापूभक्ताची श्रद्धा डळमळीत करू शकत नाही. शिवाय गळ्यातील त्रिपुरारी त्रिविक्रम लॉकेट हे एक अशा प्रकारचं कवच असतं की ज्यामुळे यमदूत कशाला, स्वत: यम जरी प्रत्यक्ष घेऊन जायला आला तरी श्रद्धावानाला फरक पडत नाही. कितीही मोठे ऑपरेशन असो किंवा प्रकृती अस्वास्थ्य असो, बापू, बापू...’ हे नामस्मरण सुद्धा श्रद्धावानाला तारून नेते

 - दंगल वाघ, धुळे   

माझ्या दृष्टीने कलियुगातील एकमेव त्राता असलेल्या माझ्या अनिरुद्धान ए मला सन २००२ साली त्याच्या सत्संगात व भक्तिगंगेत ओढून घेतले. आजवर त्याच्या कृपेचे अनुभव पदोपदी येत गेले आहेत. परंतु माझे मरण समोर दिसत असतानाही मला मरणाच्या दारातून खेचून आणणार्‍या माझ्या परमकृपाळू सद्गुरुमाऊलीच्या कृपेचा नुकताच आलेला हा अनुभव.

१ ऑक्टोबरला माझ्या वृषणाला एक छोटीशी गाठ असल्याचे लक्षात आले. एक दोन दिवस मी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु नंतर आमचे फॅमिली डॉक्टर दिनेश बियाणी यांना दाखविले. त्यांनी दोन दिवसांच्या गोळ्या दिल्या परंतु गाठ मोठी होत चालल्याने, त्यांनी डॉ. चेतन पाटील यांच्याकडे पाठविले. त्यांनी आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या करून, तांबड्या व पांढर्‍या पेशी वाढल्याचे सांगून त्यावर उपचार सुरू केले. दुसर्‍या दिवशी डायबिटीसची टेस्ट केली. डायबिटीस नियंत्रणात होता. सायंकाळी ६ वाजता सांघिक उपासनेसाठी केन्द्रावर गेलो. गाठीच्या जागी वेदना जाणवत होत्या म्हणून खुर्चीत बसलो. राजेशसिंह वाणी यांनी मला आरती करण्यास सांगितले. आरती झाल्यावर गजर आणि गार्‍हाणे यासाठी खाली मांडी घालून बसलो. तोपर्यंत कोणत्याच वेदना जाणवल्या नाहीत. परंतु नंतर वेदना सुरू झाल्यामुळे प्रवचनाची सीडी ऐकण्यासाठी न थांबता प्रमुख सेवक नंदुसिंह सोनार यांना तब्येतीविषयी सांगून घरी परतलो. दुसर्‍या दिवशी एक नातलग वारल्याने त्याच्या अंतयात्रेलाही जाऊन आलो. अधून मधून वेदना जाणवत होत्या.

एका मित्राच्या सल्ल्याने धुळेमधील ख्यातनाम सर्जन डॉ.सुभाष भामरे यांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्व वैद्यकीय रिपोर्ट्स दाखविले. त्यांनी मला लगेचच ऍडमिट करून घेतले व ऑपरेशन करून गाठ काढून टाकणेच योग्य होईल असे सांगितले.

मला बापू या शारीरिक त्रासातून तारून नेतील याची खात्री होती. मी हॉस्पिटलच्या रूममध्ये एकटाच झोपलो होतो. झोपेत मला एक स्वप्न पडले. स्वप्नात असे दिसले की खूप गर्दी आहे व तिथे चार स्त्रिया यमदूताच्या रूपात फिरताहेत. त्या प्रत्येकाजवळ जाऊन म्हणायच्या, ‘चला पुढे’. नंतर त्या माझ्याजवळही येऊन म्हणाल्या, ‘चला घ्या यालाही.’ असे म्हणून चौघींपैकी एक माझ्याजवळ आली, तेव्हा तिला माझ्या गळ्यात असलेले बापूंचे त्रिपुरारि लॉकेट दिसले. त्यावेळी ती म्हणाली, ‘राहू द्या याला. चला पुढे.’ असे म्हणून निघून गेली.

मी या स्वप्नाविषयी कुणालाच सांगितले नाही. डॉ.भामरे नेहमी रात्री ९ नंतर ऑपरेशन्स करतात. माझा नंबर किती वाजता लागेल हे निश्‍चित नव्हते. दिवसभरात ऑफिसमधले सहकारी, नातलग, तसेच अनेक बापूभक्त भेटून जात होते, मला धीर देत होते.

रात्री १:३० वाजता मला ऑपरेशनसाठी नेण्यात आले. तेव्हा मला माझी दोन्ही मुलं, आतेभाऊ व बापूभक्त छोटूसिंह बसलेले दिसले. मी ओ.टी.मध्ये जाण्याअगोदर जवळ असलेल्या परमपूज्य बापूंच्या पादुका असलेल्या फोटोवर माथा टेकला व ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल झालो. माझे नाव, गाव विचारपूस करता करता मला डॉक्टरांनी ऍनेस्थेशिया दिला. परंतु ऍनेस्थेशिया देऊनही मला त्यांचे बोलणे समजत होते. डॉक्टरांनी माझ्या आतेभावाला व मुलाला बोलावून घेतले व माझे बी.पी. खूप वाढल्याचे सांगून मला ‘आस्था इन्सेन्टीव्ह केअर हॉस्पिटल’मध्ये अतिदक्षता विभागात ऍडमिट करावे लागेल असे सांगितले व त्यासाठी ऍम्ब्युलन्सही मागविली. माझ्या गळ्यातील बापूंच्या लॉकेटला कुणीतरी हात लावल्याचे मला जाणवले आणि थोड्याच वेळात माझे बी.पी. टेस्ट केले असता नॉर्मल आले!

माझ्या तोंडातून सतत ‘हरि ॐ बापू हरि ॐ’ असा बापूंचा धावा चालू होता. माझ्या गळ्यातील बापूंच्या त्रिपुरारि चिह्नाच्या लॉकेटला कुणीतरी हात लावल्याचे पुन्हा जाणवले. ऑपरेशन झाल्यावर मला कॉटवर शिफ्ट केले गेले.
डॉक्टरांनी माझ्या मुलाला जवळ बोलावून विचारले, ‘‘हे बापू कोण आहेत? ऑपरेशन चालू असताना पेशंट सतत ‘बापू बापू....’ उच्चारत होते.’’ माझ्या मुलाने सांगितले, ‘‘ते माझ्या पप्पांचे सद्गुरु अनिरुद्ध बापू आहेत.’’
आदल्या रात्री पडलेले स्वप्न पडताळून पाहताना लक्षात आले की माझा काळ बनून यमपाश आवळला गेला होता. परंतु जणू माझ्या बापूंनीच त्या काळाला परतावून लावले.
॥ हरी ॐ॥

0 comments:

Post a Comment